आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा कोरोना:जिल्ह्याला शिथिलता देताच आढळून आलेत दोन कोरोनाबाधित रुग्ण

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • वाशिम जिल्ह्यातील रुग्ण वर्ध्यात पॉझिटिव्ह

 ग्रीन जिल्हा असल्याची ओळख प्रशासनाने करुन दाखविली. शिथिलता देताच वाशिम जिल्ह्यातील युवक तर आर्वी तालुक्यातील महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. मृतक महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून,या ग्रीन असलेल्या जिल्ह्याला गालबोट लागले आहे.

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील 35 वर्षीय महिलेला गळ्याचा त्रास होत असल्यामुळे ती 8 मे रोजी आर्वी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आली असता, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्या महिलेला वर्धेतील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात जाण्यास सांगितले. पण, वाटेतच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. सावंगी मेघे येथील रुग्णालयात डॉक्टरांनी मृतक महिलेचा स्त्राव घेऊन वैद्यकीय तपासणी करण्याकरिता पाठविला असता ,तो तपासणी अहवाल 10 मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. ग्रीन जिल्हा असलेल्या जिल्ह्यात शिथिलता देताच दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्याने जिल्ह्याला गालबोट लागले असल्याचे दिसून येत आहे.

 महिलेच्या अंत्यसंस्कारात असलेल्या नागरिकांची होणार तपासणी

मृतक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने,आर्वी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या महिलेच्या अंत्यसंस्कारा दरम्यान उपस्थित असलेल्या नागरिकांची  वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ अजय डवले यांनी सांगितले आहे.

 हिवरा तांडा गाव झालेत बंदिस्त

मृतक महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. प्रशासनाने हिवरा तांडा गावाकडे धाव घेत मृतक महिलेच्या संपर्कात असलेल्या नागरिकांची माहिती घेणे सुरु केले असून,गाव पूर्णपणे बंदिस्त करण्यात आले आहे.

 दोन दिवस जिल्हा लॉकडाऊन

वर्ध्यात व आर्वी तालुक्यात कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळून आल्याने,दोन दिवस जिल्हा लॉकडाऊन करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे. 

 वाशिम जिल्ह्यातील रुग्ण वर्ध्यात पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यातील कामगार हा सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दिनांक ८ मे रोजी उपचार्थ दाखल झाला होता. त्याचा स्त्राव वैद्यकीय तपासणी करिता पाठवण्यात आला असता,अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.या रुग्णावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मडावी यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...