आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:चाळीसगाव, अमळनेर, चोपड्यात दोन नगरसेवक वाढले, आरक्षणाकडे लक्ष

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १५ नगरपालिकांची अंतीम प्रभाग रचना आज (दि.९) रोजी जाहीर झाली. या १५ पालिकांमध्ये एकूण २५ प्रभाग आणि ४३ नगरसेवकांची संख्या वाढली आहे. सर्वात जास्त सात नगरसेवक रावेर शहरात तर सर्वात कमी फक्त एक नगरसेवक पाचोरा शहरात वाढणार आहे. अंतीम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. आरक्षणानंतर निवडणुकीचा पुढील प्रक्रिया सुरु होईल. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, नशिराबाद, भुसावळ, वरणगाव, सावदा, रावेर, फैजपूर, यावल या १५ पालिकांचा पंचवार्षिक कालावधी यापूर्वीच संपला आहे. लवकरच निवडणुका होणार आहे. त्यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. त्यावर नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या.

पालिकेमार्फत अंतिम प्रभाग रचना आज रोजी जाहीर करण्यात आली असून शहरात दोन नवीन प्रभागाची निर्मिती झाल्याने नगरसेवकांची संख्या देखील वाढणार आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार ३४ ऐवजी ३६ नगरसेवक निवडून येणार आहेत. अमळनेर नगरपरिषदेची मुदत डिसेंबर महिन्यात संपली असून पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र पालिका निवडणुकीच्या हालचाली वाढल्या असून त्यानुसार शहरातील अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात शहरात एक वॉर्ड वाढला असून, नगरसेवकांची संख्या दोनने वाढली आहे. पालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम लागला, त्यावेळी पालिकेला प्रभाग रचनेविषयी ३६ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ११ हरकती पालिकेने मंजूर केल्या. तर २५ हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. शहरातील वार्ड क्रमांक ५, ६ व ९ मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर पालिकेने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे.

चाळीसगावातही ३६ नगरसेवक : चाळीसगाव | पालिका प्रभाग आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर मागवलेले आक्षेप, सूचना हरकती घेऊन अंतिम अहवाल तयार करुन पालिका प्रशासनाने तो निवडणूक आयोगास पाठवला होता. पालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचना आराखड्यात निवडणूक आयोगाने बदल केले नसल्याचे दिसून आले. पालिकेत दोन नगरसेवकांची संख्या वाढेल.

अमळनेर | शहराबाहेरील शासकीय आयटीआय जवळील व पालिकेच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या वस्तीचा भाग, जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आल्याने, भाजयुमोचे राकेश पाटील यांनी हरकत घेतली आहे. त्यावर विभागीय आयुक्तांकडे १० रोजी सुनावणी होणार आहे. गट क्रमांक १६३०/२ वस्तीचा भाग, भौगोलिक दृष्ट्या ढेकूसिम ग्रामपंचायतीत जोडण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा भाग अमळनेर पालिकेच्या प्रभाग आठ मध्ये समाविष्ट होता.

बातम्या आणखी आहेत...