आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव बामसेफचे 2 दिवसीय राज्य अधिवेशन:'धर्माधारित देशाचा आग्रह - एक राष्ट्रघातकी पाऊल' यासह ज्वलंत विषयांवर होणार चर्चा

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बामसेफ या संघटनेचे ३५ वे राज्य अधिवेशन २७ व २८ ऑगस्ट रोजी ला. ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे तर, अध्यक्षा बामसेफच्या डॉ. दीपा श्रीवस्ती असतील.

माजी कस्टम आयुक्त तथा जोतिराव फुले सामाजिक क्रांती संस्थेचे बी. डी. बोरकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे अधिवेशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय राज्य अधिवेशनात 'जाती आधारित जणगणनेबाबतीत लोकांच्या इच्छेचे दमण : लोक उद्रेकाला आमंत्रण' या विषयावर सत्यशोधक ओबीसी परिषदेचे उल्हास राठोड, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अकीफ डफेदार, ज्येष्ठ विधिज्ञ अभिमान हाके-पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

अध्यक्षस्थानी बामसेफचे संघटना सचिव एम.डी.चंदनशिवे असतील. 'संविधानवादाचे व्यवहारिक पैलू आणि क्रियान्वयन' या विषयावर महाराष्ट्रातील बामसेफ प्रतिनिधी मत मांडतील. अध्यक्ष बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते असतील. २८ ऑगस्ट रोजी 'धर्माधारित देशाचा आग्रह-एक राष्ट्रघातकी पाऊल' या विषयावर नागपूर विद्यापीठच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.सरोज डांगे, प्रा.गणपत धुमाळे, नितीन सावंत हे मार्गदर्शन करतील.

डॉ.विनोद पवार सांगली हे अध्यक्षस्थानी असतील. 'खासगीकरण आणि कंत्राटी पध्दतीच्या दुष्परिणामाला नष्ट करण्याची रणनीती-एक राष्ट्रव्यापी चर्चा' या विषयावर भूमिपूत्र बचाव आंदोलनाचे नेते शशी सोनवणे, आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य समन्वयक अरुण गाडे, महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शहाजी गोरवे मार्गदर्शन करतील.

बामसेफचे राष्ट्रीय सचिव डॉ.संजय इंगोले अध्यक्षस्थानी असतील. या अधिवेशनाच्या महाप्रबोधन कार्यक्रमाकरीता महाराष्ट्रातून २५० ते ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील व समविचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाची तयारी जिल्ह्यात सुरु आहे. उपस्थितीचे आवाहन जय वाघ, सचिन धांडे, मनोहर गाडे, प्रशांत सपकाळे, विद्याधर भालेराव, उत्तम गोमटे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...