आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघड:दोन दिवस उशिराने मान्सून; ढगाळ वातावरणाची शक्यता, आज सुपरमून दिसणे अवघड

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दोन दिवस उशिराने मान्सून अखेर सोमवारी खान्देशात दाखल झाला. गुजरातच्या किनारपट्टीवरून खान्देशात दाखल झालेला मान्सून द्रोणीय स्थितीत मराठवाड्यातील परभणी, तिरुपती, पुड्डूचेरीमार्गे बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. गुजरातच्या दक्षिणेतून त्याची उत्तरेत वाटचाल सुरू आहे. दरम्यान, मान्सूनचा वेग वाढला असून, मुंबईतून अवघ्या तिसऱ्याच दिवशी मान्सून खान्देशात दाखल झाला.

हवामान विभागाने याबाबत अधिकृतपणे ही माहिती जाहीर केली आहे. हवामान विभागाने २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता, त्याच वेळी खान्देशात ११ जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज होता.

बातम्या आणखी आहेत...