आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात घट:जळगावात उद्यापासून‎ दाेन दिवस पाऊस शक्य‎

जळगाव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत‎ पाेळून निघालेल्या मुंबई आणि‎ काेकणात शनिवारी देखील उच्चांकी‎ ३८ अंश सेल्सिअस तापमान नाेंदवले‎ गेले. समुद्र किनारपट्टीवर वाढत्या‎ तापमानात आर्द्रतेमुळे उकाडा असह्य‎ झाल्याने मुंबई ते केरळपर्यंत उष्णतेची‎ लाट निर्माण झाली आहे. दुसरीकडे‎ उर्वरित महाराष्ट्रात साेमवारपासून‎ अवकाळी पावसाचे सावट असल्याने‎ काहीशा ढगाळ वातावरणात कमाल‎ आणि किमान तापमानात घट झालेली‎ आहे.

भारत माैसम विभागाने‎ राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट‎ १८ मार्चपर्यंत लांबणार असल्याचा‎ अंदाज शनिवारी वर्तवला आहे.‎ जळगावसह उत्तर महाराष्ट्रात १३ व १४‎ मार्च असे दाेन दिवस अवकाळी पाऊस‎ हाेण्याची शक्यता असल्याने गहू,‎ हरभरा, मक्याचे नुकसान हाेऊ शकते.‎

बातम्या आणखी आहेत...