आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस:दोन दिवस पावसाचेच ; शहरात गुरुवारच्या पावसाने संचारले चैतन्य

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची जिल्हाभरात प्रतीक्षा हाेती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी दुपारी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शहरात मात्र पावसाची रिमझिम हजेरी हाेती. ढगाळ वातावरण व श्रावणातील सरींनी वातावरणात चैतन्य आले. रात्री १० वाजेपासून शहरात अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस सुरू हाेता.

गेल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पाऊस नसल्याने उन्हाचा चटका वाढला असून तापमान वाढल्याने वातावरणात उकाडा जाणवताे आहे. हवामान विभागाने गुरूवारपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली हाेती. गुरुवारी दुपारी बाष्पयुक्त ढगांनी आकाशात गर्दी केली हाेती. शहरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तर जळगाव तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जाेर अधिक हाेता. पुढील २ दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...