आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची धुरा दोन कर्मचाऱ्यांवर ; आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागात पुरेशी कर्मचारी संख्या नसल्याने केवळ दोन कर्मचाऱ्यांवर कामे सुुरू असल्याचे चित्र आहे. मंजूर १५ पदांपैकी २ पदे या स्थितीत भरलेली असल्याने १३ पदे अद्याप रिक्त आहे. त्यामुळे विभाग रिकामा झाला असून, पुरेशा कर्मचाऱ्यां अभावी कामे खोळंबत आहे. समाजकल्याण विभाग विशेष समाजकल्याण अंतर्गत येतो. यावर जिल्हा परिषदेचे विशेष नियंत्रण नसले तरी विविध योजना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत राबवल्या जातात. विभागात अनेक महिन्यांपासून जिल्हा समाजकल्याण अधिकारी पद प्रभारी आहे. यासह कार्यालय अधीक्षक, ४ निरीक्षक, २ वरिष्ठ लिपिक, १ कनिष्ठ लिपिक, ३ शिपाई, १ चालक असे पद रिक्त आहेत. काही महिन्यांपासून एक निरीक्षक व एक सहायक लेखा अधिकारी हे विभागाची धुरा सांभाळत आहे. विभागाकडून अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास योजना अंतर्गत दरवर्षी ३० कोटींच्या वर निधी उपलब्ध होतो. त्याचे नियोजन व व्यवस्थापन करणे, शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, कलावंत मानधन योजना, २० टक्के मागासवर्गीय योजना व ५ टक्के दिव्यांग योजना राबवल्या जातात. त्यामुळे या कामासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. विभागाची रिक्त पदे भरावीत या मागणीसाठी विभागाचा समाजकल्याण आयुक्तांकडे पाठपुरावा सुरु आहे; मात्र कार्यालयाने याकडे लक्ष दिले नसल्याची स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...