आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेमंड कंपनीच्या आवारात कामगारांना मज्जाव करण्यासंदर्भात न्यायालयात दाखल अंतरीम अर्जावर बुधवारी दाेन तास युक्तिवाद झाला. व्यवस्थापनाने प्रवेश बंदीचे समर्थन केले तर संघटनेतर्फे काम बंद आंदाेलन पुकारले नसून, व्यवस्थापनानेच काम बंद ठेवल्याचा आराेप केला. याप्रकरणी गुरुवारी न्यायालयात निकाल देण्यात येणार आहे. दरम्यान, कंपनीने कामगारांकडून बेकायदेशीर कामबंद आंदाेलन सुरू आहे. असे असले तरी कर्मचारी आणि भाग भांडवलधारकांचे हित जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे.
कापड उद्याेगातील नामांकित रेमंड कंपनीच्या जळगाव येथील प्रकल्प गेल्या सहा दिवसांपासून बंद आहे. कामगारांना देण्यात येणाऱ्या वेतन वाढीच्या करारावरून हा वाद निर्माण झाला आहे. कामगारांशी चर्चा न करताच वेतन करार केल्याचा तसेच कामगारांचे दबाव टाकून स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आराेप करण्यात आला आहे. यावरून कंपनीचे व्यवस्थापन व खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेच्या कामगारांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. व्यवस्थापनाने यासंदर्भात पाेलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच कामगारांना कंपनीच्या आवारात प्रवेश बंदी करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता. त्यात न्यायालयाने ५० मीटरपर्यंत प्रवेशास मज्जाव केला आहे. या अर्जावर बुधवारी व्यवस्थापनातर्फे उर्वरित पान.४
कंपनी : कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न
रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कामगारांचे आंदाेलन बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. मान्यताप्राप्त युनियन व कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये वैधव कायमस्वरूपी समझाेता केला हाेता. असे असतानाही कामगार काही बाह्यशक्तींचा वापर करून २४ फेब्रुवारीपासून प्लांट परिसरात बेकायदेशीर आंदाेलन सुरू केले आहे. हा संप बेकायदेशीर असून प्लांटच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी आहे. कर्मचाऱ्यांचे व सर्व भागधारकांचे हित जपण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेननुसार उपाययाेजना केल्या जात असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.