आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्यांची कबुली:घरफाेडी करणाऱ्या टाेळीचे दाेघे जेरबंद

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात बंद दुकाने, घरफाेडी तसेच अॅल्युमिनियम तार चाेरीचे प्रकारही समाेर आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी नेमलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पाेलिस पथकाने दाेन चाेरट्यांना अटक केली. त्यांनी त्यांच्या चार साथीदारांसह यावल, पहूर व जळगाव एमआयडीसी हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.

एलसीबीचे निरीक्षक किसन नजनपाटील यांनी नेमलेल्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे भुसावळातून शेख शकील शेख सलीम (रा. पंचशील नगर) व शेख आसिफ शेख अकबर (रा. मुस्लिम काॅलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांनी यावल, पहूर व एमआयडीसी पाेलिस ठाण्यात केलेले गुन्हे साथीदार वसिम अहमद पिंजारी, चॅम्पियन श्याम इंगळे, श्याम सुभाष शिरसाठ उर्फ अब्दुल गफ्फुर, आवेश अहमद पिंजारी यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. शेख शकील शेख सलिम व शेख आसिफ शेख अकबर या दाेघांना यावल पाेलिसांच्या ताब्यात दिले.

बातम्या आणखी आहेत...