आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा:चोपडा धरणगाव रोडवर मालवाहतूक रिक्षा व मोटरसायकलची समोरासमोर धडक, दोन मित्र ठार तर एक जखमी

चोपडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मित्रासोबत त्याच्या बहिणीला भेटायला जात असताना अपघात

चोपडा धरणगाव रस्त्यावर शनिवारी दुपारी तीन वाजता भीषण अपघात झाला. चोपडा वेले रस्त्यावर साईबाबा मंदिराच्या पुढे धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील तिघे तरुण मोटारसायकलने चोपडयाकडे येत होते. यावेळी धरणगावकडे जाणारी मालवाहतूक रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील नितीन निंबा वाघ, हर्षल भिका पाटील, ऋषिकेश छोटू पाटील हे आपल्या मोटरसायकलने चोपड्यात सुदरगढी येथे ऋषिकेशच्या बहिणीला भेटण्यासाठी येत होते. यावेळी चोपडयाहून धरणगावकडे जाणारी मालवाहतूक रिक्षा यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात नितीन निंबा वाघ (20), हा जागीच मयत झाला होता. तर हर्षल भिका पाटील(20) याला जळगाव घेऊन जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. तर ऋषिकेश छोटू पाटील(21) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चोपड्यात एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

चोपडा शहर पोलिस ठाण्यात ऋषिकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून मालवाहतूक रिक्षा चालक याच्याविरुद्ध कलम 304 ,279, 338 ,184 मोटार वाहन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलfस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत. या अपघातात घटनास्थळी हवालदार राजेंद्र पाटील, प्रदीप राजपूत, मधुकर पवार हे हजर होते. या अपघातातील आरोपी वाहन चालक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...