आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. जळगाव जिल्ह्यातही गुरुवारी दोन बाधित आढळून आले. यापैकी एक बाधित हा जळगाव शहरातील असून, त्याला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. त्यामुळे संसर्ग कुठे आणि केव्हा झाला याचा काहीही थांगपत्ता नाही. अशा परिस्थितीत संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणून काळजीही अधिक करावी लागते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये म्हणून अधिक काळजी घ्यावी लागणार. त्यातच मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. या ठिकाणाहून दररोज हजारो नागरिक रेल्वेने जळगाव जिल्ह्यात येतात, हा धोकाही लक्षात घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी एक रुग्ण जळगाव शहरातील गणपतीनगरातील आहे तर दुसरा चोपडा तालुक्यातील आहे. गेल्या आठवड्यातील एक रुग्णदेखील अजून सक्रिय आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविडबाधित आढळलेल्या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून, संपर्कातील नागरिकांनी मात्र तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांचा संसर्ग इतिहास अज्ञात असल्याने आणि जळगाव, भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन असल्याने नागरिकांनी मास्क वापरायला सुरू करावे, असा सल्ला आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिला आहे.
ताप येताच टेस्ट करा सध्या ट्रॅव्हल्स हिस्ट्री नसताना व कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसताना रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ताप आला किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले असता तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच वसतिगृहात राहायला येण्याआधी विद्यार्थ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
लग्नसराई, रेल्वे प्रवास धोक्याचा लग्नसराई, यात्रोत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांना सध्या प्रचंड गर्दी होते आहे. सध्या जे कोरोनाबाधित समोर येताहेत ते लक्षणे नसलेले आहेत. अर्थात, त्यांचा गर्दीतला वावर हा अधिक धोक्याचा ठरू शकतो. मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहतो आहे. मात्र, येथून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना सध्या गर्दी आहे. त्यामुळे मास्कचा वापर स्वयंस्फूर्तीने केला तर दारातला कोरोना घरात येण्यापासून रोखता येऊ शकते, असे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.