आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाची भीती:मालेगावहून पळून आलेले दोन पोलिस निलंबित, बंदोबस्तावरून यापूर्वीच तीन जण पळून आले होते

जळगाव2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी मालेगाव येथे त्यांना विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त केले होते

मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेले जळगावचे पाच पोलिस कर्मचारी पळून आले होते. त्यापैकी तिघांना याआधीच निलंबित केले आहे. तर बुधवारी आणखी दोन पोलिसांना निलंबित केले आहे. यात पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले सोनजी सुभाष कोळी व महेंद्र प्रकाश शिंपी यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातून मालेगाव जिल्हा नाशिक ग्रामीण येथे ११० पोलिस कर्मचारी बंदोबस्ताकरीता पाठवण्यात आले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी मालेगाव येथे त्यांना विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त केले होते. यात जळगाव जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्तसाठी गेलेल्या पाच कर्मचारी पळून आले होते. या दोघांनी मालेगाव ते जळगाव असा विनापरवाना प्रवास करून स्वतःचे व त्यांच्या कुटुंबियांचे व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर पोलिस कुंटुबियांचे आरोग्य धोक्यात घातल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...