आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार गंभीर दुसरा:दुचाकी समोर आल्यानंतर चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहनाला ओव्हरटेक करताना दुचाकीसमोर समाेर बस आली. बसचालकाने दुचाकीला वाचविताना बस रस्त्याच्या कडेला खाेलगट भागात उतरली. त्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी चालवणारा गंभीर जखमी झाला तर मागे बसलेला किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी 10.45 च्या सुमारास महामार्गावर नशिराबादनजीक टीव्ही टाॅवरजवळ घडला. प्राप्त माहीतीनुसार, कडू बाविस्कर (वय 27) हा गंभीर जखमी झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर भुरा बाळु राजपूत किरकोळ जखमी असून जीएमसी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मित्राच्या लग्नासाठी बाेदवड तालुक्यातील नडगाव येथील कडू बाविस्कर, भुरा बाळु राजपूत व आणखी एक जण दुचाकीने पाळधी येथे ट्रिपलसीट जात होते. कडू बाविस्कर हा दूचाकी चालवत हाेता. गाडीला ओव्हरटेक करताना जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या (एम.एच. 14 बी.टी. 0098) ही बसच्या समाेर आली. बसचालकाने दुचाकीला वाचविताना बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खाेलगट भागात उतरली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली. तर दुचाकीस्वारांचे प्राण वाचले.

पण या अपघातात कडू बाविस्कर गंभीर जखमी झाला. व भुरा राजपूत हा किरकोळ जखमी झाला तर दूचाकीवर बसलेल्या तिसऱ्याला दुखापत झाली नाही. या अपघातात बसमधील तुरळक प्रवाशांना खरचटले व ते किरकोळ जखमी झाले. नशिराबाद येथील स्थानिक नागरिकांनी मदत करून वाहतूक पाेलिसांच्या मदतीने दूचाकीवरील जखमी कडू बावस्करला खासगी रुग्णालयात दाखल केले. कडू बावस्कर या तरुणांच्या डाेक्याला जबर दुखापत झाली असून फॅक्चरही झाले आहे.

दुसरा जखमी भुरा याचे सिटी स्कॅन करण्यात आले असून त्याच्यावर जीएमसीत उपचार सुरु आहेत. या प्रकरणी उशिरा पाेलिसात गुन्ह्याची नाेंद करण्यात येणार हाेती.

वृध्देचे पाकिट हरविले...

या अपघातात बसमधील उषाबाई मधुकर धनगर या ( रा. बांभाेरी) वृध्देचे पाकिट गहाळ झाले. त्या जळगावहून भुसावळ येथे नातेवाईकांकडे जात हाेती. अपघात झाल्यानंतर ती नशिराबाद येथून घटनास्थळी परत आली. पाकिटात 1 हजार रुपये राेख, आधारकार्ड व औषधाच्या गाेळ्या हाेत्या. तिच्या जवळ पैसे नसल्याने पाेलिसांनी तिला कालीपिलीत भुसावळपर्यंत बसवून दिले.

बातम्या आणखी आहेत...