आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस्वाराचा उर्मटपणा:दुचाकी माझी, मी आर्मीत, जोरात चालवेल, तुझ्या बापाचे काय जाते, असे म्हणत पोलिसाच्या कानशिलात लगावली

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यावर ड्युटी करीत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने कानशिलात लगावली. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता चाळीसगाव शहरात ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना अशी की, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रशांत तुकाराम पाटील (वय 42, रा. श्रीकृष्ण कॉलनी, चाळीसगाव) हे मंगळवारी डॉ. के. टी. पाटील यांच्या रुग्णालयासमोर ड्युटी करीत होते. यावेळी भूषण दिलीप जाधव (रा. ओढरे शिंदी, ता. चाळीसगाव) हा भरधाव दुचाकीने (एमएच 19 बीआर 1729) आला. पाटील यांनी त्याला थांबवले.

दुचाकी हळू चालव, गर्दीचे ठिकाण आहे, असे त्याला बजावले. याचा राग आल्याने जाधव याने थेट पाटील यांची कॉलर पकडून ढकलून दिले. ही दुचाकी माझी आहे, मी आर्मीत आहे, जोरात चालवेल तुझ्या बापाचे काय जाते, असे म्हणत त्याने थेट पाटील यांच्या कालशिलात लगावली. मारहाण करून शर्ट फाडला. या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...