आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळवरून रुग्णाला जळगावात आणणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० वाजता नशिराबाद उड्डाणपुलाखाली हा अपघात झाला. रुग्णवाहिकेने (क्र. एमएच १४ सीएल ०८०१) चालकाने विरूध्द दिशेने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला (क्र. एमपी ०९ एक्सएफ ७२२२) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक रोशन कुमार (वय २४, रा. बिहार) याला गंभीर दुखापत झाली. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाेलिसांनी जखमीला रुग्णालयात हलवून वाहतुक सुरळीत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.