आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Two Years Ago, The Youth Committed Suicide Under The Running Train, His Father Also Jumped Under The Train; Incidents Near Asoda Railway Gate

धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या:2 वर्षांपूर्वी वडीलांनीही घेतली होती रेल्वेखाली उडी; आसोदा रेल्वेगेट परिसरातील घटना

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी वडीलांनी धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. याची पुनरावृत्ती मंगळवारी रात्री केली. त्याने आसोदा रेल्वेगेट परिसरात धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी मृताची ओळख पटली.

लखन संजय सोनवणे (वय 22, रा. सुनसगाव, ता. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लखन हा दोन भाऊ व आईसह सुनसगावात राहत होता. परिसरातीलच एका खासगी कंपनीत नोकरीला होता. मंगळवारी सायंकाळी कामानिमित्त बाहेर जावून येतो, असे सांगुन तो घराबाहेर पडला.

यानंतर त्याने आसोदा रेल्वेगेट परिसरात रेल्वे खंबा क्रमांक 433/21 येथे पवन एक्सप्रेससमोर झोकून देत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे व सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुरूवातील मृताची ओळख पटलेली नव्हती. खिशातील कागदपत्राच्या आधारे लखनची ओळख पटवण्यात आली.

यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना माहिती दिली. मंगळवारी रात्री मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. बुधवारी सकाळी कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. लखनचे अद्याप लग्न झालेले नव्हते. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण समोर आलेले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुटुंबियांना दुसरा धक्का

दोन वर्षांपुर्वी लखनचे वडील संजय सोनवणे यांनी अशाच पद्धतीने धावत्या रेल्वेखाली झोकुन देत आत्महत्या केली होती, अशी माहिती लखनच्या नातवाईकांनी दिली आहे. या दोन्ही घटनांमुळे सोनवणे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. मृत लखनच्या पश्चात आई रंजनाबाई, दोन भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...