आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेपाच लाख शिष्यवृत्ती लाटली:खान्देश बहुउद्देशीय संस्थेच्या अभियांत्रिकीतील प्रकार; दोघांवर गुन्हा

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट कागदपत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांची साडेपाच लाखांची शिष्यवृत्ती दोघांनी लाटल्याची तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खान्देश बहुद्देशीय संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी हे बांभोरी येथे आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्राचार्य या तिघांच्या नावाने संस्थेचे स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे टाकले जातात. संस्थाध्यक्षा यांचे पती रतीलाल वना पाटील (आर. व्ही पाटील, रा. शिव कॉलनी) व उपाध्यक्षा यांचे पती विलास दत्तात्रय नायर (रा. प्रभुदेसाई नगर) या दोघांनी १२ मे २०१८ ते २४ जून २०२१ या कालावधीत बँक व्यवहारात विश्वासात न घेता स्वाक्षरी बदलण्याची प्रक्रिया केली.

यानंतर बनावट ठराव करून प्राचार्य सचिन पाटील यांच्या स्वाक्षरीचा अधिकार काढून घेतला. दिशाभूल करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे ५ लाख ६१ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्राचार्य पाटील यांनी गुरुवारी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रतीलाल पाटील व विलास नायर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

कोर्टाच्या आदेशाने धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
प्राचार्य सचिन पाटील यांनी या अपहाराच्या संदर्भात सन २०१९मध्ये पाळधी दूरक्षेत्र येथे तक्रार केली होती. लॉकडाऊन काळात पोलिसांनी अर्जाची चौकशी केली नाही. यानंतर २०२१मध्ये पुन्हा एक अर्ज दिला. त्याचीही चौकशी झाली नाही. अखेर त्यांनी धरणगाव न्यायालयात धाव घेतली. सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...