आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • U Win App Will Provide Information On Immunization Of Children, Pregnant Women On Mobile; Vaccination Can Be Done Anywhere In The Country| Marathi News

दिव्य मराठी विशेष:यू विन अॅपमुळे लहान मुले, गर्भवतींच्या लसीकरणाची माहिती मिळणार मोबाइलवर ; देशभरात कुठेही करता येईल लसीकरण

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना लसीकरणाप्रमाणेच आता लहान मुलांसह गर्भवती महिलांना देण्यात येणाऱ्या लसीकरणाची माहिती मोबाइलवर सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरणाचे रेकॉर्ड सांभाळण्याची गरज भासणार नाही आणि देशभरात कुठेही लसीकरणाचा फायदा घेता येईल. यासाठी केंद्र सरकारने ‘यू विन’ नावाचे अॅप तयार केले आहे. हे अॅप वर्षाअखेरीस सुरू होणार आहे. कोविन अॅपप्रमाणेच हे अॅपदेखील कार्य करणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने कोविन अॅपची निर्मिती केली. या अॅपचा फायदा झाल्याने शासनाने आता लहान मुले व गर्भवती महिलांसाठी “यू विन’ अॅप तयार केले आहे. हे अॅप पायलट प्रोजेक्ट स्वरूपात पुढील आठवड्यात मध्य प्रदेशातील भोपाळ आणि झाबुआ शहरात सुरू होईल. यात काही अडचण आल्यास बदल करून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हे अॅप संपूर्ण देशभरात सुरू होईल. या अॅपच्या माध्यमातून लहान मुलांना जन्मापासून देण्यात येणाऱ्या सर्व लसीकरणाची माहिती देण्यात येणार आहे.

मोबाइलवरून होणार नोंदणी
गर्भवती महिलांची नोंदणी ही त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून होईल. प्रसुती झाल्यानंतर बाळाची नोंदणीही याच नंबरवरून करण्यात येईल. लसीकरणाची संपूर्ण माहिती ही मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर प्राप्त होईल.

लसीकरणाच्या महत्त्वाच्या बाबी
जन्मानंतर २४ तासांत : बीसीजी, पोलिओ, हिपॅटायटिस बी.
दीड महिन्यानंतर : पोलिओ, आयपीव्ही, पेंटावेलेंट, पीसीव्ही, रोटा.
अडीच महिन्यांनंतर : पोलिओ, पेंटावेलेंट, रोटा.
साडेतीन महिन्यांनंतर : पोलिओ, आयपीव्ही, पेंटावेलेंट, पीसीव्ही, रोटा.
नऊ महिने : पीसीव्ही, गोवर, मेंदुज्वर.
१६ ते २४ महिने : पोलिओ, गोवर, मेंदुज्वर, डीपीटी.

बातम्या आणखी आहेत...