आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंनी पॉवर:मी हनुमानाला केलेल्या प्रार्थनेमुळे उद्धव एकटे

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पॉवरचा वापर करून तुरुंगात टाकले. तुरुंगात १२-१२ तास हनुमान चालिसा पठण केले. माझ्या भक्तीमध्ये थोडीही ताकद असेल तर हनुमंतराय त्यांना जागा दाखवेल, अशी प्रार्थना केली. आज त्यांच्या घरात उभे राहण्यास व सतरंजी उचलणारा कार्यकर्ता उरला नाही. माजी मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसाने पाठ दिली, अशा शब्दात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

बालाजीपेठेतील महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे सोमवारी रात्री आठ वाजता हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा दांपत्यासह जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे उपस्थित होते. राणा यांनी जय श्रीराम, जय हनुमानाचा जयघोष केला. त्या म्हणाल्या, आम्ही मोदींचे भक्त आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. हनुमान चालिसाने मला शकवले. महाराष्ट्रावरील संकट दूर होण्यासाठी उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा पठण करण्याची विनंती केली होती. त्यांनी पठण केले नाही. आम्हाला तुरुंगात टाकून देशद्रोहाचे कलम लावले. काेर्टात गेल्यानंतर ते वकिलांकडून कळले, असे म्हणत त्यांनी उपस्थित जनतेला उद्देशून प्रश्न विचारला. या देशात हनुमान चालिसा वाचणे, रामभक्त होणे गुन्हा, पाप आहे का? हात वरती करुन सांगा, हा गुन्हा होता का? या देशात हा गुन्हा असता तर हिंदू विचारधार कधीच संपली असती. ती विचारधारा ठाकरेंनी सोडली. तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. मी कमजोर नाही. लढू शकते, पुढेही लढणार.

बाळासाहेब ठाकरेंनी हजार वेळा पठण करायला लावली असती : महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी महिलांचा सन्मान केला. नेहमी त्यांना सन्मानित केले. महाविकास आघाडीसोबत राहून खऱ्या हिंदुत्वाचे विचार उद्धव ठाकरे विसरुन गेले होते. उद्धव ठाकरेंनी एका महिलेला तुरुंगात टाकले. तुरुंगात बसायला चटईही दिली नाही. ज्यांनी हनुमान चालिसा वाचू दिली नाही. हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना तुरुंगात टाकले. हनुमान चालिसा न वाचल्यामुळे चाळीस आमदार बाहेर पडले. आता ठाकरेंची परिस्थिती काय आहे?, आज बाळासाहेब ठाकरे असते तर एकदा नाही हजार वेळा मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचा, असे म्हणाले असते. मातोश्री हे हिंदुचे तीर्थस्थान आहे. हनुमानाचे नाव घ्यायला कुणी रोखणारा अजून जन्माला यायचाय, असे राणा म्हणले. नेत्यांचा उल्लेख करताना राणा यांनी देवंेद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून दोन वेळेस उल्लेख केला. यावेळी राणा दाम्पत्याने सामूहिक हनुमान चालिसा पठण केले.

बातम्या आणखी आहेत...