आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Uddhav Thackeray's Banner Removed In Pachora; The Banner Put Up By Vaishali Suryavanshi Is Being Discussed That The Banner Was Removed Due To Pressure| Marathi News

शिवसैनिकांकडून तीव्र नाराजी:पाचोऱ्यात पालिकेची तत्परता उद्धव ठाकरे यांचे बॅनर काढले; वैशाली सूर्यवंशींनी लावले हाेते बॅनर दबावापोटी बॅनर काढल्याची चर्चा

पाचोरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा पालिका प्रशासनाने शहरातील बॅनर्स काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैशाली सूर्यवंशी यांनी शहरात ठिकठिकाणी लावलेले शुभेच्छा बॅनर्स नगरपालिका प्रशासनाने काढले. यामुळे शिवसैनिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक महिने झळकत राहणारे बॅनर्स तक्रारी करूनही काढले जात नाहीत. मग, गेल्या दोन दिवसांपूर्वीच लावलेले बॅनर्स काढण्याची पालिका प्रशासनाने तत्परता दाखवल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर्स शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच हे बॅनर्स पालिकेकडून काढण्यात आले. तर इतर काही जुने बॅनर अजूनही तसेच आहेत. मग यामागे काही राजकारण आहे का? पालिका प्रशासनाने कुणाच्या दबावाखाली बॅनर्स काढले? शहरातल्या मोठ्या समस्या सोडून केवळ बॅनरसाठी एवढी तत्परता पालिकेने कशी दाखवली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर अशाच चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, पालिकेच्या या कृतीमुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शहरसह तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी आपल्या संतप्त भावना वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे व्यक्त केल्या. तर शिवसैनिकांना शांत राहण्याचा सल्ला देऊन माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. पाटील यांचा आदर्श वैशाली सूर्यवंशी यांनी कायम ठेवला.

बातम्या आणखी आहेत...