आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये‎ वगळलेला 30 % भाग पूर्ववत‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या परीक्षेत देण्यात आलेल्या सर्व ‎शिथिलता यंदाच्या परीक्षेपासून आता रद्द ‎ ‎ करण्यात आल्या आहेत. ज्याप्रमाणे शंभर ‎ ‎ टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा होणार ‎ ‎ आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांत ‎ ‎ प्रात्यक्षिक परीक्षेतही ३० टक्के भाग‎ वगळण्यात आला होता. ती शिथिलता‎ यंदाच्या प्रात्यक्षिक परीक्षेपासून रद्द‎ करण्यात आली आहे.

तर‎ बाह्यपरीक्षकांच्या देखरेखीखाली‎ प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल.‎ दुसरीकडे राज्य मंडळाच्या वतीने‎ घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे‎ प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी ३‎ वाजता शाळेच्या लॉगिनमधून उपलब्ध‎ करून दिले जाणार आहे. दरम्यान, यंदा‎ विद्यार्थ्यांना उशिरा आल्यास परीक्षा‎ दालनात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे‎ मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.‎ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण‎ मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची‎ लेखी परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार‎ आहे. तत्पूर्वी, २० फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक‎ परीक्षांना सुरुवात होत आहे.‎

या परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्रांचे वितरण‎ विद्यार्थ्यांना शाळांनी करायचे आहे. तर ६‎ फेब्रुवारी रोजी शाळांच्या लॉगिनमध्ये‎ हॉलतिकीट डाऊनलोड करून घेता येईल.‎ विद्यार्थी, शिक्षक आणि पालक‎ www.mahahsscboard.in या‎ संकेतस्थळावर अधिक माहिती पाहू‎ शकतात. हॉलतिकिटाची ऑनलाइन प्रिंट‎ देताना शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क‎ विद्यार्थ्यांकडून आकारू नये. प्रिंटवर‎ मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का‎ असावा.

हॉलतिकिटात विषय व माध्यम‎ बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या मंडळात‎ जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. फोटो,‎ स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख‎ आणि जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या‎ माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून‎ त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित‎ पाठवावी, असेही मंडळाने म्हटले आहे.‎ हॉलतिकीट गहाळ झाल्यास शाळांनी पुन्हा‎ प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत‎ असा शेरा देऊन प्रवेशपत्र द्यायचे आहे,‎ असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा‎ ओक यांनी पत्रात नमूद केले आहे.‎

गैरप्रकारावरील शिक्षासूची‎
दहावी, बारावीच्या परीक्षेत अनेकदा‎ कॉपी, बोगस कागदपत्रे जमा करणे‎ असे प्रकार होताना दिसून येत‎ आहेत. या प्रकारांना आळा‎ घालण्यासाठी मंडळातर्फे यंदा‎ शिक्षासूची जाहीर झाली आहे .‎ कागदपत्रात तफावत, कॉपीसारखे‎ प्रकार समोर आल्यास परीक्षेची‎ संपादणूक रद्द करण्यात येणार आहे.‎ तर कॉपीसाठी सहकार्य करणाऱ्या‎ पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल हाेईल.‎

बातम्या आणखी आहेत...