आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली:नियाज अली फाउंडेशनने काढली एकात्मता रॅली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सै नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे रविवारी राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. १९९७ पासून फाउंडेशनने ही परंपरा सुरु ठेवली आहे. सकाळी १० वाजता सर्वधर्मीय धर्म गुरुंच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून भिलपुरा चौकातून रॅलीस सुरुवात झाली.

घाणेकर चौक, टाॅवर चौक, नेहरू चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे चौक सुभाष चौकातून भिलपुरा चौकात समारोप झाला. सै. अयाज अली नियाज अली यांनी रॅलीचे नेतृत्व केले. पंडित देवीलाल व्यास, मुजावर बाबा फैय्याज नुरी, ग्यानी गुरुप्रीत सिंग, फादर पास्टर सुरेश माहुरे व शंभरावर नागरिक सहभागी झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...