आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्था:विद्यापीठ प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया सुरू ; मूळ कागदपत्रे जमा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणूक प्रक्रीयेला प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पोर्टल सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६चे कलम २६मध्ये नमूद केलेल्या विविध प्राधिकरणांच्या विद्यमान सदस्यांची पाच वर्षांची मुदत ३१ ऑगस्ट २०२२ रोजी समाप्त होत आहे. या कायद्याच्या कलम ६२ (१) नुसार प्रत्येक नवनियुक्त प्राधिकरणांच्या सदस्यांची मुदत १ सप्टेंबर २०२२ पासून दिनांक ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी असेल. या प्राधिकरणांच्या निवडणूक, नामनिर्देशन व स्वीकृतीची प्रक्रीया सुरु करण्याचे कुलगुरुंनी निर्देश दिले आहेत. निवडणूकी संदर्भांतील संपूर्ण माहिती, अधिसुचना व इतर अनुषंगिक पत्रव्यवहार विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावरील www.nmu.ac.in/election या पोर्टलवर तसेच मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कक्ष क्र.४०७ च्या बाजूला नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.

या ठिकाणी स्वीकारणार मूळ कागदपत्रे निवडणूक विभागप्रमुख म्हणून डॉ. एस. आर. भादलीकर हे काम पाहणार आहेत. निवडणुकीच्या संदर्भातील मूळ कागदपत्रे व पत्रव्यवहार डॉ. भादलीकर निवडणूक विभाग प्रमुख कक्ष क्र.४१० तिसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, कबचौ उमवि, जळगाव येथे स्वीकारला जाईल. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये/ मान्यताप्राप्त परिसंस्था व सायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, व्यवस्थापन प्रतिनिधी, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर, यांनी नोंद घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...