आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर:34 जागांसाठी 8 जानेवारी रोजी मतदान; विभागप्रमुखांसाठीही निवडणूक

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अध्यापक आणि व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटांमधून निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठीचा निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला आहे.

8 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. याशिवाय विद्यापीठ अध्यापक व संलग्नित महाविद्यालयांमधील अध्यापक यांच्या गटांमधून प्रत्येक विद्याशाखेनिहाय विद्यापरिषदेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी आणि अभ्यासमंडळासाठीच्या देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अधिसभेवर प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अध्यापक आणि व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटांमधून विविध जागा निवडून दिल्या जाणार आहेत. अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी कळवली आहे.

विभागप्रमुखांसाठीही याच तारखांप्रमाणे निवडणूक

विभागप्रमुखांच्या गटामधून अभ्यासमंडळावर निवडून द्यावयाच्या 3 विभागप्रमुखांसाठी आणि विद्यापीठ अध्यापक गट, संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामधून अध्यापकांच्या गटांमधून प्रत्येक विद्याशाखेनिहाय विद्यापरिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन सदस्यांसाठी देखील‍ निवडणूक कार्यक्रम याचा तारखांप्रमाणे जाहीर झाला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

15 व 16 डिसेंबर : उमेदवारांना उमेदवारी अर्ज करणे

17 डिसेंबर : सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी, वैध व अवैध उमेदवारांची यादी जाहीर

19 डिसेंबर : सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत

22 डिसेंबर : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

8 जानेवारी : सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत प्रत्यक्ष मतदान

10 जानेवारी : सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी

असे आहे सदस्य

  • व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटांमधून 6 सदस्य अधिसभेवर निवडून द्यावयाचे आहेत. त्यामध्ये 4 जागा अराखीव, 1 जागा अनु. जमाती, 1 जागा महिलांसाठी आहे.
  • महाविद्यालयांच्या अध्यापकांमधून 10 सदस्य अधिसभेवर निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये 5 जागा अराखीव आणि अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी प्रत्येकी 1 जागा राखीव आहे.
  • प्राचार्यांमधून 10 सदस्य अधिसभेवर निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये 5 जागा अराखीव आणि अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी प्रत्येकी 1 जागा राखीव आहे.
  • विद्यापीठ अध्यापकांच्या गटांमधून 3 सदस्य अधिसभेवर निवडून दिले जातील त्यामध्ये 1 अराखीव, 1 अनु. जमाती आणि 1 महिलांसाठी राखीव आहे.
बातम्या आणखी आहेत...