आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू माफियांवर कारवाईचा बडगा:पोलिसांच्या 'ऑल आऊट'ऑपरेशनमध्ये रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री ‘ऑल आऊट’ मोहिम राबवली. यात केसी पार्क भागात विना परवाना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पथकाने पकडले. रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

‘ऑल आऊट’ मोहिमेत शहर पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी एकाच वेळी हद्दीत गस्त करीत होते. यावेळी केसी पार्क भागात पोलिस नाईक राजकुमार चव्हाण यांच्यासह कर्मचारी फिरत होते. या भागात एक ट्रॅक्टरमध्ये दिड ब्रास वाळू ताडपत्रीतने झाकून चोरी करीत असल्याचे दिसून आले. पथकाने ट्रॅक्टर अडवल्यानंतर चालकास वाहतुकीची परवना मागीतला. त्याच्याकडे परवाना नव्हता. यामुळे पथकाने एक लाख रुपयांचे ट्रॅक्टर (एमएच 18 एएन 2547) व साडेसात हजार रुपयांची वाळू जप्त केली. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टरचालक नवदीप कैलास पाटील व मालक जितेंद्र प्रकाश कोळी (रा. निमखेडी) या दोघांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे तपास करीत आहेत.

जिल्ह्यात वाळू चोरी बोकाळली

जिल्ह्यातील सर्व नदीपात्रातून वाळूचोरी वाढली आहे. वाळू माफिया पोलिस, महसुलाच्या पथकांना न जुमानता चोरी करीत आहे. ही पथके एखाद दुसऱ्या वाहनांवर कारवाई करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...