आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईच्या हालचाली:दूध संघातील अनावश्यक निवृत्तांना मिळणार नारळ

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध संघात अनेक महत्त्वाच्या अधिकारी पदांवर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले आहे. संघातील तूप, लाेणी अपहार आणि बी ग्रेड तूप विक्री प्रकरणात या कंत्राटी अधिकाऱ्यांचाच थेट संबंध असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे नवीन संचालक मंडळ डिसेंबर अखेरीस सेवानिवृत्तांना नारळ देण्याची शक्यता आहे. पहिल्या बैठकीतच हा निर्णय घेण्याच्या हालचाली आहेत.

दूध संघात प्रशासनाचे प्रमुख म्हणून नियुक्त केलेले सी. एम. पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बी ग्रेड तूप खरेदी करणाऱ्या एजन्सी चालकाचे ते काका असल्याची बाब समाेर आल्यानंतर त्यांना पाेलिसांनी अटक केली हाेती. त्यांच्यासह कार्यकारी संचालक मनाेज लिमये हेदेखील सेवानिवृत्त असून, दाेघेही सध्या निलंबित आहेत. त्यांच्यासह अन्य काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थेट अधिकारी पदावर नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची यादी संचालक मंडळाने तयार केली आहे. रविवारी हाेणाऱ्या अध्यक्ष निवडीनंतर त्यावर निर्णय होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...