आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचे ढग:आज मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज; मंगळवारी गारपिटीचीही शक्यता

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग घाेंगावत आहेत. दोन दिवस उत्तर महारा‌ष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील २ दिवस मराठवाडा-विदर्भ भागांवर वादळी पावसाचे संकट आहे. ७ मार्चला दाेन्ही विभागांत गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कारण : राज्यात पश्चिमी विक्षाेभामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या प्रभावाने अवकाळीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कमाल तापमान ३८ अंशापुढे जात असताना ४ मार्चपासून वातावरण ढगाळ झाले आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रापुरत्या असलेल्या अवकाळीच्या संकटाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे.

इशारा : ६ मार्चला मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यात पाऊस तर ७ मार्चला गारपीट हाेऊ शकते. ८ मार्चनंतर अवकाळीचे वातावरण निवळू शकते.

धुळ्यात गारपिटीने केळीची बाग भुईसपाट, नाशकातही पाऊस
धुळे | शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात गहू, हरभरा व इतर पिकांचे नुकसान झाले. वरझडीत वीज पडून दोन बैलाचा मृत्यू झाला. हिंगोणीत केळीच्या बागेतील रोपे कोसळली. दहिवदला गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील हरसूल, अभोणा, डांगसौंदाणे परिसरात पाऊस पडला.

बातम्या आणखी आहेत...