आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेत मनुष्यबळाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गरज २६०० कर्मचाऱ्यांची असताना केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांवर काम पार पाडावे लागत आहे. आकृतिबंध लवकर मंजुरीसाठी आता राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत; परंतु महासभेत केलेल्या ठरावापेक्षा शंभर कर्मचाऱ्यांची माहिती अपूर्ण सादर केली आहे. त्यातील त्रुटी दूर न केल्याने मंजुरीच्या प्रक्रियेतील अडचणी वाढल्या आहेत.
मनपाच्या स्थापनेपासून आजपर्यंत आकृतिबंध मंजूर झालेला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महापालिकेने महासभेच्या ठरावानंतर प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही मंजुरी मिळत नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या कारभारावर झाला आहे. महापालिकेत २६०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण केवळ १२०० कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय गाडा हाकण्याची वेळ आयुक्तांवर आली आहे. एकेका कर्मचाऱ्याकडे दाेन ते तीन जबाबदाऱ्या आहेत. नगरविकास, मनपाच्या...
महापाैरांनी घेतली सचिवांची भेट : आकृतिबंध मंजुरीसाठी महापाैर जयश्री महाजन यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांसह अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात महापालिकेने प्रस्ताव सादर करताना २५७१ कर्मचाऱ्यांची माहिती सादर केली आहे. त्यांचे कागदपत्र असल्याने त्यातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु प्रत्यक्षात मनपाच्या महासभेत २६७१ कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाकडून कागदपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांच्या त्रुटी दूर करण्यावर भर दिला जातो आहे. त्यामुळे महापालिकेतील १०० पदांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
मंत्र्यांच्या माध्यमातून निर्णय शक्य : महापालिकेचा ठराव व प्रत्यक्षातील प्रस्ताव यात तफावत असल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास विभागाकडून उपलब्ध कागदपत्रांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या अडचणी साोडवण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.