आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:देवळाली-भुसावळ एक्स्प्रेसची वेळ पूर्वीचीच करण्याचा आग्रह

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ विभाग रेल्वे सल्लागार समितीची १६९वी बैठक मंगळवारी विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयात झाली. बैठकीला देवळाली-भुसावळ एक्स्प्रेसची वेळ पूर्वी प्रमाणे करा यासह सदस्यांनी आपाआपल्या स्थानकांतील समस्यांसह, प्रवासी सुविधेबद्दल विचार मांडले. १५पैकी ११ सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते. सदस्यांनी मांडलेल्या समस्या, प्रश्नांना विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडीया यांनी उत्तरे देत मार्गदर्शन केले. या वेळी वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रबंधक डॉ. शिवराज मानसपुरे उपस्थित होते. ११११३ देवळाली-भुसावळ पॅसेंजर/एक्स्प्रेस ही चाकरमानी, व्यापारी, विध्यार्थी व ग्रामीण जनतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. या गाडीने अनेक वर्षांपासून विद्यार्थी, व्यापारी, नाेकरदार हे अप-डाऊन करत आहे. या गाडीची वेळ आता बदलवण्यात आल्याने त्यामुळे अनेक चाकरमान्यांची गैरसाेय झाली आहे. त्यामुळे देवळाली-भुसावळ एक्स्प्रेसची वेळ पूर्वी प्रमाणेच करावी अशी मागणी सल्लागार समितीचे दिलीप पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...