आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:मास्क वापरा, बूस्टर डोस घेऊन स्वत: सुरक्षित रहा, इतरांचीही काळजी घ्या; बैठकीत सूचना

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीएमआरच्या सूचनेनुसार जून अखेर राज्यात चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी नव्याने दोन बाधित समोर आले. या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) कौन्सिलची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत संभाव्य लाटेच्या दृष्टीने औषधसाठा उपलब्धता, कृत्रिम ऑक्सिजन पाइपलाइन तपासणी, स्वत: बूस्टर डोस घेऊन काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्यासह कौन्सिलचे सदस्य यांची या बैठकीला उपस्थिती होती. यात संभाव्य लाटेच्या दृष्टीने सर्व औषधींचा साठा उपलब्ध करून ठेवणे, व्हेटिलेंटरची व कृत्रिम ऑक्सिजन पाइपलाइनची तपासणी करुन संभाव्य लाटेबाबत सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्वच जणांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यात आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचाही समावेश आहे. जीएमसीतील ज्या स्टॉफचा तिसरा डोस बाकी आहे अश्या कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करून घेऊन आजारी न पडण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी या बैठकीत दिल्या आहेत.

नवीन दोन बाधित, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना संसर्ग
राज्यासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. सोमवारी नव्याने दोन रुग्ण समोर आले. यात जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील व धरणगाव येथील पुरुषाचा समावेश आहे. आरडीसी पाटील यांनी लसीचे दोन डोस घेतलेले आहे. दोन्ही रुग्णांमध्ये कुठलीही लक्षण आढळून आलेली नाहीत. सोमवारच्या नवीन दोन रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १० झाली. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...