आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत वापरा ‘इझी आयक्यू’ अ‍ॅप:कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी ठरणार फायदेशीर

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला नाही तर काही विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या. परिणामी विद्यार्थी अभ्यासात प्रचंड मागे पडले. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता शहरातील पाच युवकांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इझी आयक्यू’ नावाचे अ‍ॅप सुरु केले असून या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तकातील धडे हे ऑडिओ, व्हिडीओ व टेक्स स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोबतच प्रत्येक प्रश्नांची उत्तरे रेकॉर्ड करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी पाठांतरानंतर आपले उत्तर अ‍ॅपमध्ये उच्चारल्यानंतर ते किती प्रमाणात बरोबर आहे. याची अचूक माहिती अ‍ॅपमध्ये कळते आहे.

शहरातील चेतन गिरणारे, अमित भामेरे, हर्षा शर्मा, अभिषेक साळवी आणि विवेक धांडे या युवकांनी एकत्र येऊन इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोफत अ‍ॅपची निर्मिती केली आहे. ‘इझी आयक्यू’ नावाचे हे अ‍ॅप सहज उपलब्ध होत असून यात पाचवी ते दहावीचे स्टेट बोर्ड आणि सीबीएससी बोर्डाच्या मराठी, इंग्रजी, हिंदी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या सर्व पुस्तकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीने जसे हवे तसे शिकता यावे याकरिता ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स अशा तीनही स्वरूपात अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना प्रश्न-उत्तरे देखील देण्यात आली आहे. या प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अधिकच सोपे होणार आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांची घेतली मदत

अँपमध्ये ऑडिओ, व्हिडिओ धडे तसेच प्रश्नांची उत्तरे रेकॉर्ड करण्यात आली असून ही सर्व माहिती जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.काही शिक्षकांनी स्वतः व्हिडीओ बनवून यात दिले आहे. या उपक्रमाची सर्व शाळांमध्ये जनजागृती सुरु असून विद्यार्थ्यांना कुठेही, केव्हाही मोफत शिक्षण घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...