आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:कोरोना-4’ची चाहूल लागताच लसीकरण वाढले ; जिल्ह्यात दिवसांत 25 हजार जणांनी घेतली लस

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना नियंत्रणात आला म्हणून काही महिन्यांपासून बिनधास्त असलेल्या नागरीकांची पावले आता पुन्हा लसीकरण केंद्राकडे वळू लागली आहेत. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता शासनाने वर्तवली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून दिवसाकाठी दीड ते दोन हजार नागरीकांचे लसीकरण व्हायचे. आता चार दिवसांचा हा एकत्रित आकडा २५ हजारांवर गेला. केंद्र शासनाने देशातील चार राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्राचा या चार राज्यात समावेश असून राज्यात आढळणाऱ्या नव्या रुग्णांपैकी ३०० नवीन बाधित एकट्या मुंबईत रोज समोर येत आहे. कोराेनाची चौथी लाट येण्याची शक्यता वाढल्याने या लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनातर्फे १ ते १४ जून दरम्यान जिल्ह्यात ‘हर घर दस्तक’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमात आतापर्यंत एकही लस न घेणारे पात्र लाभार्थी, दुसरी लस बाकी असलेले व बुस्टर डोस राहिलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...