आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमाल:विद्यार्थ्यांच्या वडिलांसाठी विविध कार्यक्रम; उज्ज्वल स्प्राऊटरमध्ये फादर्स-डेची धमाल

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्ज्वल स्प्राऊटर स्कूलमध्ये फादर्स-डे साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांच्या वडिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. नेहमी पालक हे शाळेतील विविध समारंभांना हजेरी लावून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवतात. त्यांना प्रोत्साहन देतात पण, या कार्यक्रमात वडिलांनी त्यात थ्रो-बॉल, स्लो-सायकलिंग, पूल-द-टेल अशा विविध खेळात सहभाग घेतला व विद्यार्थ्यांनी त्यांना प्रोत्साहन देत आनंद लुटला.

शाळेच्या अध्यक्षा अनघा गगडाणी, विश्वस्त प्रवीण गगडाणी, मुख्याध्यापिका मानसी गगडाणी, प्रशासकीय समन्वयक स्वप्निल बोरसे, शैक्षणिक समन्वयक सुनयना चोरडिया व पद्मजा घैसास यांनी उद्घाटन केले. नंतर विद्यार्थ्यांनी वडिलांप्रती कविता तसेच गीत सादर केले व काही विद्यार्थ्यांनी दिमाखदार नृत्य सादर केले. उपस्थित मान्यवर आणि पालकांनी त्यांना दाद दिली.

बातम्या आणखी आहेत...