आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Various Schemes Including Nutrition Will Now Be Available From A Single Office; The Name Of Continuing Education Is Now Education Officer| Marathi News

बदल:पोषणासह विविध योजना आता एकाच कार्यालयातून मिळणार; निरंतर शिक्षणाचे नामांतर आता शिक्षणाधिकारी याेजना

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय शिक्षण विभाग यांच्या अधिपत्त्यात असलेल्या अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर शिक्षण संचालनालय (योजना) असे करण्यात आले आहे. यात जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाकडील विद्यार्थी लाभाच्या योजना, पोषण आहार, मोफत गणवेश वाटपसारखे उपक्रम एकाच कार्यालयाकडून राबवण्यात येणार आहे.

शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण कार्यालय शासनाकडून मे २०२२पासून राज्यभरातील कार्यालये पूर्णत: बंद करण्यात आली हाेती. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या वर्ग ‘अ’ ते ‘ड’पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे उपशिक्षण संचालक, संचालक व शिक्षणाधिकारी कार्यालयात वर्ग करण्यात आले होते; मात्र हे २२ जूनपासून कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाकडून निर्णय काढण्यात आला.

त्याच्या नावात बदल करण्यात आला. त्याची कार्यवाही करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पत्र काढण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण कार्यालयाच्या जागेचा ताबा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात आला होता. आता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण कार्यालयाचा ताबा शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील पदेही संचालनालय योजनांकडे वर्ग केली आहेत.

या पाच जिल्ह्यांत जागा द्या
वाशिम, हिंगोली, गोंदिया, नंदुरबार व पालघर येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये शिक्षणाधिकारी योजना कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा सूचना दिल्या आहेत. जागा उपलब्ध होईपर्यंत प्रचलित पद्धतीप्रमाणे कामकाज होईल. विद्यार्थी लाभाच्या योजना प्राथमिक व माध्यमिक यांनी वर्ग करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहे.

योजना वर्ग करण्याच्या सूचना
३० जिल्ह्यांमध्ये निरंतर कार्यालयाचे नामांतर शिक्षणाधिकारी योजना असे करण्यात आले आहे. या जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या सर्व अभिलेख शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे तातडीने वर्ग करण्याचा सूचना शासनाचे उपसचिव टि. वा. करपते यांनी दिलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...