आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी:पिंप्राळा रेल्वेगेट रस्त्यावर चिखलाने वाहने घसरली

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंप्राळा रेल्वेगेट ते शाहूनगर रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. पाइप टाकल्यानंतर मातीचा भराव व्यवस्थीत न टाकता रस्त्यावरच पसरला आहे. जेडीसीसी बँक काॅलनीच्या काॅर्नरवर चिखलामुळे अनेक वाहने घसरण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सुरू हाेता. पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर चिखल असल्याची जाणीव हाेत नाही. अचानक चिखलात वाहने अडकून घसरत हाेती. रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान सुमारे १५ ते २० वाहने घसरल्याने वाहनचालकांसह नागरीकांना मार लागला. पालिकेने तातडीने उपाययाेजना करावी अन्यथा बुधवारी नागरीकांचे हाल हाेण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

बातम्या आणखी आहेत...