आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सीए शाखेच्या अध्यक्षपदी‎ विकी बिर्ला यांची निवड‎; अभिषेक कोठारी यांनी मानले आभार

जळगाव‎7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव येथील सीए शाखेचा पद‎ हस्तांतरण सोहळा रविवारी आयसीए‎ भवनात झाला. त्यात शाखा अध्यक्षपदी‎ सीए विकी बिर्ला यांची निवड करण्यात‎ आली. माजी अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी‎ त्यांना पदभार दिला.‎ जिल्हाधिकारी अभिजित राऊत,‎ केंद्रीय परिषद सदस्य उमेश शर्मा प्रमुख‎ पाहुणे होते. उपाध्यक्षा ममता राजानी‎ केजरीवाल, सचिव अभिषेक कोठारी,‎ कोषाध्यक्ष हितेश आगीवाल, रोशन‎ रुणवाल, सोहन नेहेते यांची सभासद‎ म्हणून निवड झाली. सीए परीक्षेत उत्तीर्ण‎ झालेल्या २३ विद्यार्थ्यांचा सन्मान‎ करण्यात आला. जीएसटीत झालेल्या‎ सुधारणा आणि जीएसटी अंतर्गत नोटीस‎ या विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले. या‎ विषयावर उमेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले.‎ दिव्या झंवर यांनी सूत्रसंचालन केले.‎ अभिषेक कोठारी यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...