आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज काेकण-मुंबईत उष्णतेची लाट:विदर्भ-मराठवाड्यावर पुन्हा अवकाळीचे सावट

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेकण आणि मुंबई परिसरात शनिवारपासून २ दिवस उष्णतेच्या लाटेत तापमान ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महारा‌ष्ट्रावर मात्र येत्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. मध्य प्रदेशावरील चक्राकार वाऱ्यामुळे राज्यातील वातावरणात हा परिणाम झाला आहे.

अशी असेल वातावरणाची स्थिती
{उष्णतेची लाट : ११-१२ मार्च, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर.

{अवकाळी पाऊस

: १३ ते १६ मार्च : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, परभणी छत्रपती संभाजीनगर १५ ते १६ मार्च नागपूर, गाेंदिया, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगाेली, बुलडाणा.

बातम्या आणखी आहेत...