आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमितांचा तीव्र विरोध:बोदवड शहरातील रस्त्याची मोजणी करताना अतिक्रमितांचा तीव्र विरोध; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर भूमापनकडून मोजणी

बोदवड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर ते बोदवड या रस्त्याचे बोदवड शहरातील काम वर्षभरापासून प्रलंबित आहे. या कामासाठी होणाऱ्या मोजणीस गुरुवारी शहरातील अतिक्रमणधारकांनी विरोध केला. ही बाब न्यायालयात दाखल आहे. त्यावर निर्णय येईपर्यंत मोजणी स्थगित ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोजणीला सुरुवात झाली.

महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडून मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, बोदवड शहरातील रस्त्याचे काम अतिक्रमित दुकानांच्या प्रश्नामुळे रखडले आहे. याचा त्रास मात्र बोदवडवासीयांना भोगावा लागतो. दुसरीकडे अतिक्रमण काढताना भेदभाव केला जातो असा काही लोकांचा आरोप आहे. याअनुषंगाने अतिक्रमणधारक उच्च न्यायालयात गेले आहेत. असे असताना एका बाजूच्या दुकानदारांना मोजणीच्या नोटीस मिळाल्या. त्यावर त्यांनी लेखी हरकत नोंदवली होती. तरीही गुरुवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून दोन्ही बाजूच्या रस्त्याची मोजणी सुरु झाली. मात्र, अतिक्रमित दुकानदारांनी या मोजणीला विरोध केला. न्यायालयाकडून निर्णय येईपर्यंत मोजणी स्थगित ठेवावी, अशी मागणी केली. यामुळे उडालेला गोंधळ पाहता पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय अंकुश जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. मोजणीला विरोध करणाऱ्यांना काहीही हरकत घ्यायची असेल ती कायदेशीररित्या घ्यावी. रस्त्यावर गर्दी करू नये, असे सांगितले. यानंतर मोजणीस पुन्हा सुरुवात झाली. तेथून पुढे जुन्या तहसीलपर्यंत रस्त्याची मोजणी पूर्ण करण्यात आली.

नकाशा दिल्यावर खुणा टाकू, अतिक्रमण काढणार
गुरुवारी अतिक्रमण धारकांच्या जागांचे मोजमाप झाले. भूमापन कार्यालयाने नकाशा दिल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल. जागांवर खुणा करून त्यानंतर अतिक्रमण काढू. नोटीस दिलेल्यांनी यावेळी थोडा गोंधळ केला. पण, पोलिसांनी त्यांना समज दिली. याबाबत ज्यांना कुणाला हरकत असेल त्यांनी कायदेशीर पुरावे सादर करावे, असे सांगितले. - कन्हयालाल गांगुर्डे, उपअभियंता, एमएसआरडीसी

बातम्या आणखी आहेत...