आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएसओ परीक्षेत जळगावचा विशाल चौधरी राज्यात पहिला:एमपीएससीतर्फे निकाल जाहीर; तलाठी म्हणून 3 वर्षांपासून कार्यरत

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (एएसओ) परीक्षेचा बुधवारी निकाल जाहीर झाला असून यात जळगाव शहरातील विशाल सुनील चौधरी यांनी 302 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे राज्यात कर निरीक्षक (एसटीआय) या परीक्षेत ओबीसी प्रवर्गामध्ये 8 वा क्रमांक मिळाला आहे. तणाव विरहित राहून सेल्फ स्टडी करत हे यश प्राप्त केल्याचे त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

एसटीआय आणि एएसओ परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. विशाल हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील निमगाव येथे तलाठी म्हणून तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. विशाल यांचे वडील सुनील भाऊराव चौधरी पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. घरीच वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत विशाल यांनी हे यश मिळविले आहे. चाळीसगाव येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर जळगावात मु.जे. महाविद्यालयात बारावी तर पदवीचे शिक्षण नूतन मराठा महाविद्यालयातून त्यांनी पूर्ण केले आहे. पदवीचे शिक्षण घेत असतानाच युपीएससीचा अभ्यास सुरु केला होता. मात्र त्यातील पद्धत जमत नसल्याने 2017 पासून एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. घरीच आपल्या पद्धतीने पुस्तके आणून हा अभ्यास केला. 2018 मध्ये युपीएससीद्वारे घेण्यात आलेली असिस्टंट कमांडरची परीक्षा दिली होती. ही परीक्षा उत्तीर्ण देखील केली मात्र मुलाखतीत काही गुणांनी नोकरी हुकली. पुढे एमपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला. 2019 मध्ये गट - क ची टॅक्स असिस्टंट जीएसटी विभाग, मंत्रालय लिपिक आणि तलाठी या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि तलाठीची नोकरी स्वीकारली.

तणावविरहित राहून केला अभ्यास

2020 मध्ये तलाठी म्हणून रुजू झाल्यानंतर दोन महिन्यातच कोरोना आला आणि अभ्यासाला ब्रेक लागला. मात्र वर्षभरानंतर आठवड्यातून एक-दोन दिवस जसे जमेल तसा अभ्यास केला. तणाव घेऊन, नोट्स काढून अभ्यास केला तर तो जमत नाही. त्यामुळे आपल्याला हवं तस तणाव विरहित राहून अभ्यास केला. कोणत्याही नोट्स यासाठी काढल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...