आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्या, काशी, मथुरा वृदांवन तसेच बद्रीनाथ, केदारनाथसह द्वारका हरिद्वार, त्रद्षिकेशहून शहरात आलेल्या शेकडो साधूंच्या उपस्थितीत मंगळवार (ता.१३) पासून विशाल श्री विष्णू महायज्ञास सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता शेकडो कलशधारी महिला डोक्यावर कलश घेवून गिरणानदीच्या काठावरून कलशयात्रा महायज्ञाच्या कार्यक्रमस्थळावर निघणार आहे.
सोमवार (ता.१९) डिसेंबरला शहरातून होणाऱ्या ‘ नागा शाही यात्रा ’ फेरीचे विशेष आर्कषण असणार आहे. यज्ञ महोत्सवातील काही धार्मीक उपक्रम शाहूनगरातील तपस्वी हनुमान मंदीरात होणार आहे. यज्ञाचा मुख्य कार्यक्रम पाळधी विद्यापीठ परिसरातील गौर्वधन गोशाळा येथे होणार आहेत.
भारतीय संस्कृती सभ्यता व संस्कारांचे रक्षण व्हावे या उद्देशाने या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम नगरी अयोध्येतील अखिल भारतीय पंचतेरा भाई त्यागी दिगंबर आखाडा खाक चौक अयोध्या नया घाट यांच्या तर्फे या भव्य श्री विष्णू महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यात होमहवनासह वर्णपूजन, अग्नी हवन, मंडलपूजन केले जाणार आहे. यानियोजनासाठी ळक्ष्मण पाटील, सुनील चौधरी, किशोर पाटील, प्रशांत पाटील, अण्णा टेलर आदी शेकडो भाविक निस्वार्थपणे नियोजन करीत आहेत.
शहरात सोमवार पर्यंत ५० पेक्षा अधिक साधूसंत दाखल झाले आहेत.
नागा साधू शाही यात्रेत सहभागी होणार २ हजारावर साधू :-
८४ योग विद्या प्रवीण साधू शहरात येणार आहे. यात सोमवार (ता.१९) रोजी दुपारी १ वाजता शाहू नगरातील श्रीतपस्वी हनुमान मंदीरापासून भव्य नागा साधू शाही यात्रा निघणार आहे. यात ७००वर नागा घोडेस्वार साधूंसह विविध धर्मक्षेत्रातील साधू सहभागी होतील. शहरातील प्रमुख मार्गावरून ही यात्रा निघून सायंकाळी ५ वाजता शाहूनगरात यात्रेचा समारोप होईल. यात सुमारे २ हजारावर साधू सहभागी होणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनासह सर्व परवानी व तयारी पूर्ण झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
असा आहे कार्यक्रम :-
१ ते २१ डिसेंबर पर्यंत अखंज रामनाम भजन सत्यंग
१३ ते १९ डिसेंबर पंचकुंडी महायज्ञ
१८ डिसेंबर ५६ भोग उपक्रम
१९ डिसेंबर भव्य नागासाधू शाही यात्रा फेरी
२० डिसेंबर - रामार्चन पूजा उत्सव
२१ डिसेंबर पर्यंत दररोज महाप्रसादी अखंड भंडारा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.