आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थम क्रमांक:विवेकानंद इंग्लिश स्कूल शालेय गटातून प्रथम क्रमांकाचे मानकरी

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय नाटिका स्पर्धा घेण्यात आली हाेती. तिचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात विवेकानंद प्रतिष्ठान संचलित विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल शालेय गटातून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. महाविद्यालयीन गटातून एम.जे. काॅलेजने प्रथम क्रमांक पटकावला. शनिवारी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डाॅ. सुनील कुळकर्णी यांच्या उपस्थितीत पारिताेषिक वितरण झाले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाचवी ते दहावी असा पहिला व अकरावी ते पदव्युत्तर दुसरा अशा दोन गटात ‘स्वातंत्र्य सैनिकांच्या समरगाथा’ राष्ट्रीय पातळीवरील नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब या राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे, सुबोध सराफ आणि ‘तुमची मुलगी काय करते’ या दूरदर्शन मालिकेतील कलाकार हर्षल पाटील हे होते. पाहुण्यांचा व परीक्षकांचा परिचय गिरीश कुळकर्णी यांनी करून दिला. ऑनलाइन वेबिनारचे संचालन डॉ. आश्विन झाला यांनी केले. सी.डी. पाटील यांनी आभार मानले.

स्पर्धेतील विजेते असे शालेय गट पाचवी ते दहावी : विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (प्रथम), विरार मुंबई येथील श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी सीबीएससी स्कूल (द्वितीय), चंद्रभागा बाबूराव तुपे साधना कन्या विद्यालय पुणे (तृतिय), भोपाळ येथील सागर पब्लिक स्कूल (उत्तेजनार्थ) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. तर महाविद्यालयीन गटात मूळजी जेठा महाविद्यालय (प्रथम), कुरूक्षेत्र युनिव्हर्सिटी सोनिपत हरियाणा (द्वितीय), जी.एस. कॉलेज ऑफ वर्धा (तृतिय) असे पुरस्कार घोषित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...