आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:पुढील वर्षापासून देशपातळीवर निश्चित हाेईल व्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क; प्रवेश व शुल्क नियंत्रण समितीचे निर्देश

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी महाविद्यालयाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वारेमाप शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आता प्रवेश व शुल्क नियंत्रण समिती (एएफआरसी) पुढील वर्षापासून शुल्क ठरवणार आहे. त्यानुसार बीटेकचे किमान शुल्क ७९,६०० रुपये तर कमाल १ लाख ८९ हजार ८०० रुपये असेल.प्रामुख्याने ह्युमन रिसोर्स, लर्निंग रिसोर्स, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन व मिसलेनियस कॉस्ट पाहून शुल्क ठरवले जाईल. शुल्क घेताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निर्देशांची अंमलबजावणी केली जाईल. त्यात किमान व कमाल शुल्काचे मापदंड निश्चित केले जातील.

संबंधित महाविद्यालयाच्या मागील तीन वर्षांतील खर्चाचा हिशेब तपासला जाईल. दरम्यान, एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफारशीनुसार ही शुल्कनिश्चिती होणार आहे. ‘एआयसीटीई’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, एखाद्या कॉलेजसाठी किमान व कमाल शुल्क निश्चित करताना त्याचे कारणही स्पष्ट केले जाईल. निर्धारित कमाल शुल्कापेक्षाही जास्त शुल्क घेण्यासाठी सशर्त मुभा दिली जाईल. ज्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे संबंधित कोर्सचे ‘एनबीए’ मानांकन (अॅक्रिडिटेशन) असणे आवश्यक आहे.

प्राध्यापकांच्या नियुक्तीचेही नियम
एखाद्या कॉलेजमध्ये चार वर्षांच्या बीटेक कोर्ससाठी ३०० जागा आहेत. म्हणजे चार वर्षांत तिथे १२०० विद्यार्थी शिकतील. तेथे २० विद्यार्थ्यांमागे एक या नियमानुसार या कॉलेजमध्ये किमान ६० शिक्षक असणे आवश्यक. यात ४० असिस्टंट प्रोफेसर, १३ असोसिएट प्रोफेसर व ७ प्रोफेसर असावेत. किमान फी निर्धारणासाठी १०% सहायक, २०% कंत्राटी प्राध्यापक नेमता येऊ शकतात. पण कमाल शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांना सर्व ६० शिक्षक हे पूर्णवेळ घेणे सक्तीचे आहे.

ग्रंथालयासाठी तरतूद
संबंधित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या एका पुस्तकाची सरासरी किंमत ७५० रुपये असेल. जितक्या किमतीची पुस्तके होतील त्यापैकी २५ टक्के खर्च लायब्ररीसाठी व २५ टक्के ई-रिसोर्स व एक टक्के वर्तमानपत्रे, मॅगझिनवर कॉलेजला करावा लागेल. पायाभूत सुविधांसाठी वीज २२०० रुपये, पाणी १५०, जनसंपर्क ६०, टेलिकॉम १५०, टॅक्सेस १५०, पायाभूत सुविधा विमा ३००, ऑडिट व अकाउंट शुल्कासह इतर खर्चाच्या नावावर ३७५० रुपये प्रति विद्यार्थी शुल्क घेता येईल.

पगाराचे नियम ठरवले : असिस्टंट प्रोफेसरसाठी ५७,७०० ते १,१७,१०० रुपये, असोसिएट प्रोफेसरसाठी १,३१,४०० ते १,९८,७००, प्रोफेसर यांना १,४४,२०० ते १,९९,६०० प्रतिमहा पे स्केल (भत्ते वगळून) असणे आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापकांसाठी ८०,००० तर कंत्राटींसाठी ६० हजार किमान दरमहा वेतन द्यावे लागेल.

इतर खर्चांसाठी मापदंड : इतर खर्चासाठी विद्यार्थ्यांकडून ६ गोष्टींच्या नावाखाली कॉलेजला शुल्क घेता येईल. यात विद्यार्थ्यांसाठी अॅक्टिव्हिटी (सोशल, जिम, क्रीडा) २०० रुपये, ओळखपत्र ७५ रुपये, रिक्रुटमेंट चार्ज १०० रुपये, लॅबोरेटरी ३५०, पायाभूत सुविधा दुरुस्ती व व्यवस्थापन ३१०० रुपये शुल्क राहील.

बातम्या आणखी आहेत...