आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाघूर पंपिंग स्टेशनला सध्या भुसावळ विभागातून वीजपुरवठा केला जाताे आहे. वीजवाहिनी बदलवण्याचे काम हाती घेतल्याने ताे बुधवारी सकाळी १०.१५ वाजता खंडित झाला. त्यानंतर दुपारी २.३० वाजता पुन्हा सुरू झाला. थाेड्याच वेळाने महापालिकेच्या पंपिंग स्टेशनमधील डिस्क इन्सुलेटर फुटल्याने सव्वातीन तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे धरणातून पुरेसे पाणी न उचलले गेल्याने शहराला बुधवारी हाेणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने राेटेशन एक दिवस पुढे ढकलले गेले.
वाघूर पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या चाेरगाव फीडरच्या लाइनला ब्रेकडाऊन झाल्याने गेल्या पंधरवड्यात वीजपुरवठ्यात व्यत्यय आला हाेता. तेव्हापासून भुसावळ विभागातून पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा केला जाताे आहे. हा वीजपुरवठा बुधवारी सकाळी १०.१५ ला खंडित झाला. बिघाड शाेधून ताे दुपारी अडीच वाजता पूर्ववत सुरू केला. त्यानंतर पंपिंग स्टेशनचे चार पंप सुरू करण्यात आले; परंतु काही वेळातच माेठा आवाज हाेऊन पुन्हा वीज खंडित झाली. मनपा वीज विभागाचे विलास पाटील व कर्मचाऱ्यांनी शाेध घेतला असता डिस्क इन्सुलेटर फुटल्याचे समाेर आले.
संध्याकाळी ५.४५ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वीज आल्यावर पाणी उचल सुरू झाली; परंतु शहराच्या आवश्यकते एवढे पुरेसे पाणी उचलले गेले नसल्याने बुधवारी हाेणारा पाणीपुरवठा पूर्ण झाला नाही. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. बुधवारचा उर्वरित पाणीपुरवठा गुरुवारी तर गुरुवारच्या पाणीपुरवठ्यात बदल करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
आज या भागात येणार पाणी, अपव्यय टाळण्याचे आवाहन
नटराज टाकी ते चौगुले मळा, शनिपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, हाउसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रताप नगर. गेंदालाल मिल टाकीवरील भाग : खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदलाल मिल, रिंगरोडचा संपूर्ण परिसर, भोईटेनगर. आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग, जुने गाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ. हेमू कलानी टाकीवरील परिसर : गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर. डायरेक्ट होणारा पाणीपुरवठा : सुप्रीम कॉलनी परिसर,डीएसपी टाकी वरून होणारा भाग:साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर,शिवरामनगर, यशवंतनगर परिसरातील उर्वरित भाग,श्रद्धा कॉलनी, नंदनवननगर, चर्चरोड, प्रभात कॉलनी, ब्रुक बाॅण्ड कॉलनी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.