आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलांच्या सुट्यांच्या काळ संपल्याने गावी आलेल्या रेल्वे प्रवाशांची परतीच्या प्रवासासाठी एकच घाई सुरू असल्याने प्रतीक्षा यादीत वाढ झाली आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यात लग्नसमारंभ व सण-उत्सवांसाठी प्रथमच मुंबई-पुण्याकडील नातलगांनी कुटुंबासह गावी गर्दी केली होती. मात्र, आता सुट्या संपल्याने परतीच्या प्रवासासाठी मुंबई, पुणे व सुरतकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत आहे. या गाड्यांना 20 जूनपर्यंत मोठी प्रतीक्षा यादी दिसून येत आहे.
अशी आहे प्रतीक्षा यादी
मुलांच्या शाळा उघडल्याने गावी आलेल्यांची सुरत, अहमदाबाद, मुंबई, पुणे येथे परतीच्या प्रवासाची लगबग सुरू झाली आहे. यात गाडी क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12834 हवडा-अहमदाबाद एक्सप्रेस, चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस, गाडी क्रमांक 1230 हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12106 विदर्भ एक्सप्रेस, 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12810 हावडा-मुंबई मेल या गाड्यांना 20 जूनपर्यंत लांबलचक वेटिंग लिस्ट आहे.
तिकीट खिडक्यांवर गर्दी
मुंबई, पुणे, सुरत व अहमदनगर आदी ठिकाणी खान्देशातील अनेकजण नोकरी, उद्योग-व्यवसाय, व शिक्षणानिमित्ताने राहतात. एप्रिल-मे महिन्यात शाळांना सुट्या असल्याने व कोरोनाचे सावटही नाहिसे असल्याने गेल्या दोन वर्षांपासून गावी न आलेल्यांनी कुटुंबासह गाव गाठले होते. त्यामुळे आता शाळा सुरू होत असल्याने गावी आलेल्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असल्याने तिकीट खिडक्यांवर गर्दी दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.