आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूरचा वारी सोहळा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. ‘सावळे सुंदर स्वरूप बिंदुले, मन हे मुराले तयापाशी’ अशा अभंगांचे गुणगाण करीत वारकरी भक्तिभावाने वारीत सहभागीहोतात. अमळनेरमधून निघणारी वारी २४ दिवसांत पंढरपुरात पोहोचते. या काळातील खर्चाचा हिशेब केला तर प्रत्येक वारकऱ्यामागे किमान सहा हजार रुपये खर्चहोतो. मात्र, वारीच्या मार्गावर सर्व व्यवस्थामोफत असल्याने वारकऱ्यांना दिंडीत एक रुपयाही खर्च करावा लागत नाही.
सकाळचा नाष्टा, दोन वेळचे जेवण, निवास व्यवस्था, चहापाणी या मूलभूत गोष्टी वारीत नि:शुल्क असतात. त्यासाठी संबंधित संस्थान, दाते, रस्त्यात वेगवेळ्या पद्धतीने मदत करणारे असंख्य हात उपयोगी ठरतात. आर्थिक विषय सोडला तर दिंडीत पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना जो मान मिळतो तो शब्दातीत असतो. अमळनेर येथील सखाराम महाराजांच्या पायी वारीत भडगावपर्यंत सुमारे १४० वारकरी जोडले गेले. पुढे औरंगाबाद जिल्ह्यात आणखी वारकरी जोडले जातात.
अमळनेर येथून १५ जून रोजी वारी निघाली. ती २४ दिवसांनंतर सुमारे ५५० किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचेल. या निमित्ताने प्रत्येक वारकऱ्याचे रोजचे जेवण, वैद्यकीय खर्च, मुक्काम असे आर्थिक गणित केले तर एका व्यक्तीपोटी सुमारे सहा हजार रुपये खर्चहोतो. जर दिंडीशिवाय कोणी पायी पंढरपूर गेल्यास येणारा खर्च त्यांना झेपावणार नाही. वारीत अनेक जण सोबत असल्याने प्रवासही जाणवत नाही. त्यामुळे वारीत जाणेच वारकरी पसंत करतात.
संस्थानच्या भूमिका महत्त्वाच्या; जेवणासह निवास व्यवस्थामोफत
वारीत शक्यतोवर ५०च्या पुढे वय असलेल्या महिला, पुरुष जास्त संख्येने सहभागी होतात. काही वृद्ध सर्वच प्रकारच्या कामातून निवृत्त झालेले आहेत. म्हणजेच ते कमावते नाहीत. अशात त्यांच्या वारीचा खर्च करणार कोण? हा मोठा प्रश्न असतो. त्यांची मुले हा खर्च उचलू शकतात; परंतु वृद्धांना वारीत जाणे अधिक पसंत असते. कारण या वारीत त्यांचे बालपणीचे मित्र, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने ओळखी झालेले लोक एकत्र येतात. त्यांच्या भेटीगाठी होतात. सुख-दु:खाच्या गप्पा होतात. त्यामुळे या वृद्धांना वारीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या भक्तीसह एक वेगळा अनुभव मिळतो. विविध संस्था, संघटना वारीचे आयोजन करतात. वारीच्या मोठ्या खर्चाचा हिस्सा संस्था उचलतात. उर्वरित खर्च वाटेत भेटणारे यजमान करतात. त्यामुळे भक्तिमार्गाचा हा प्रवास सुखकर होतो आहे. यात संस्थानच्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हा खर्चीक प्रवास वृद्धांना विनामूल्य करता येतो. आनंद व भक्ती अशा दोन्ही बाबी त्यांना वारीत मिळतात.
प्रतिदिवस एका व्यक्तीचा खर्च असा : चहा व नाष्टा ५० रुपये, जेवण (दोन वेळ) १५० रुपये, वेदनानाशक औषधी १० रुपये, रात्रीचा निवारा (धर्मशाळा वगैरे) २० ते ५० रुपये, इतर खर्च (साबण, टूथपेस्ट वगैरे) ५ रुपये. हा सर्व खर्च एकत्र केला तर दररोज एका वारकऱ्यावर २६५ रुपये खर्चहोतो. म्हणजेच २४ व्या दिवशी पंढरपुरात ही वारी पोहाेचते तोपर्यंतचा हिशेब केला तर प्रत्येक वारकऱ्यावर ६ हजार ६६० रुपये खर्चहोतो. त्यात रेल्वेने परत येतानाचा ३०० रुपये प्रवास खर्च ग्राह्य धरला आहे. वारकरी संप्रदायाशी जुळलेली मंडळी वारीच्या प्रत्येक मुक्कामाचा खर्च करते. एका मुक्कामाचा १४० वारकऱ्यांवर प्रती व्यक्ती ७५ रुपये प्रमाणे १० हजार ५०० रुपये खर्चहोतो. मात्र, असे असले तरी हा खर्च वारकऱ्यांना करावा लागत नाही हे उघड आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.