आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपंचायतीचे मुख्यधिकारी हे जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. पोलिसांनी वेळीच कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने शिवसेना आंदोलन उभारेल असा इशारा निवेदनातून दिला. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन दिले. शेंदुर्णी नगरपंचायतीच्या लेटरपॅडवरील मुख्याधिकाऱ्यांच्या सहीचे धमकीचे पत्र काहींना शेंदुर्णीत पोस्टाद्वारे ७ जूनला मिळाले होते. याबाबत जळगाव नियोजन मंडळाचे संजय गरुड यांनी पत्र पाठवल्यावर, मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत पत्र दिले नसल्याचा खुलासा केला.
तसेच नगरपंचायतीने मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झेंडे व बॅनर काढले. त्यामुळे जातीय सलोख्याला बाधा निर्माण होत असल्यानचे शिवसैनिकांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच दखल न घेतल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. पहूर पोलिस स्टेशनला निवेदन देताना, शेंदुर्णी शहरप्रमुख संजय सूर्यवंशी, विलास बारी, अशोक बारी, जय हरी, भूषण बडगुजर, युवासेना शहर अधिकारी अजय भोई, प्रवीण चौधरी, सागर चौधरी, पांडुरंग पाटील, सागर बारी, गणेश पांढरे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
पत्रावरील माझी स्वाक्षरी बनावट, मीच तक्रार दिली जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या आदेशानेच शेंदुर्णी नगरपंचायत हद्दीतील बेकायदेशीर फलक व झेंडे काढण्यासाठी कर्मचारी गेले होते. परंतु नागरिकांचा विरोध झाल्याने कारवाई थांबवण्यात आली. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच माझ्या बनावट सहीने नगरपंचायतीच्या लेटरपॅडवर गावातील काही नागरिकांना चुकीचे पत्र दिल्या प्रकरणी मी स्वतः पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. साजिद पिंजारी, मख्याधिकारी, शेंदुर्णी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.