आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी-मार्टजवळ काम सुरू:जलवाहिनीच्या जाेडणीसाठी शहरात आज पाणीपुरवठा बंद ; राेटेशन एक दिवसाने पुढे सरकले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात हाेणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. १२०० मीमीच्या मुख्य जलवाहिनीला ८०० मीमी जलवाहिनी जाेडणीचे काम डी-मार्टजवळील चाैकात सुरू आहे. त्यामुळे शहरात गुरूवारी पाणीपुरवठा हाेणार नाही. शहरातील राेटेशन बदलामुळे गुरुवारचा पुरवठा शुक्रवारी हाेईल.

शहरात अमृत अभियानांतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीची जाेडणी सुरू आहे. महिनाभरात शहरातील सर्वच जलकुंभांना नवीन जलवाहिनी जाेडणीचे उद्दीष्ट पूर्ण केले जाणार आहे. जुन्या जलवाहिनीतून हाेणारा पाणीपुरवठा बंद करून नवीन जलवाहिनीतून पुरवठा करण्यासाठी जाेडणीचे काम सुरू आहे. मेहरूण परिसरात डी-मार्ट चाैकात अमृत याेजनेंतर्गत टाकलेली १२०० मीमी व्यासाची जलवाहिनी आकाशवाणी मागे असलेल्या जलकुंभाला जाेडण्याला येणार आहे. या कामाला बुधवारी सुरूवात झाली आहे.

गुरूवारी हे काम सुरू राहणार आहे. मुख्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह बंद करावा लागणार असल्याने ५ राेजी शहरातील पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ५ राेजीचा पुरवठा ६ जानेवारीला तर ६ व ७ जानेवारीचा पुरवठा ७ व ८ जानेवारी राेजी करण्यात येणार आहे.

शुक्रवारी या भागात येईल पाणी पिंप्राळा गावठाण उर्वरीत भाग, पिंप्राळा हुडकाे, सेंट्रल बँक काॅलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभुजा परिसर, वाटीका आश्रम परिसर, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा काॅलनी, आहुजानगर, निमखेडीचा भाग, नित्यानंद नगर, संभाजीनगर, रायसाेनीनगर, समतानगर, तांबापुरा, जिल्हा राेड, रामदास काॅलनी, शारदा काॅलनी, महाबळ काॅलनी, नुतन वर्षा काॅलनी, चैत्रवन काॅलनी, आनंदनगर, तिवारीनगर, बाहेती शाळा, भगवाननगर.

सिमेंट जलवाहिनी बंद हाेणार नगरपालिका असताना पूर्वी सिमेंटची जलवाहिनी टाकली आहे. आता अमृत याेजनेत डीआय पाइप टाकले. नेहमीच्या गळतीची समस्या साेडवण्यासाठी मनपाकडून जलकुंभांना जलवाहिनी जाेडणीचे काम सुरू आहे. आगामी काळात सिमेंटची जलवाहिनी बंद हाेईल.

बातम्या आणखी आहेत...