आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभ:मोहननगरात पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होणार

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभाग क्रमांक १२ आणि १३ मधील बहुसंख्य भागात पाणीपुरवठा होणाऱ्या नित्यानंदनगर जलकुंभ भरणारा भाऊंचे उद्यानाजवळील विद्युतपंप बुधवारी सकाळी नादुरुस्त झाला. त्यामुळे नित्यानंदनगर, रायसोनीनगर, मोहननगर परिसरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा केला जाणार आहे. बुधवारचा पुरवठा गुरुवारी दुपारनंतर तर गुरुवारचा पाणीपुरवठा शुक्रवारी होणार आहे. नित्यानंदनगर, रायसोनीनगर, संभाजीनगर, मोहननगर, समतानगर, अनुराग स्टेट बँक कॉलनी, धांडेनगर, विवेक कॉलनी, देवेंद्रनगरात नित्यानंदनगर जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो; परंतु नित्यानंदनगर जलकुंभ भरणारा भाऊंचे उद्यानाजवळील ७५ एचपीचा विद्युत पंप बुधवारी नादुरुस्त झाला. त्यामुळे जलकुंभ भरला नाही. गुरुवारी दुपारपर्यंत दुरुस्ती होऊन दुपारी २ वाजेनंतर काही भागात पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. नित्यानंदनगर जलकुंभावरून पुरवठा होणाऱ्या भागात एक दिवस रोटेशन पुढे ढकलले आहे. त्यामुळे बुधवारी ज्या भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही त्या भागात गुरुवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होईल. गुरुवारचा पुरवठा शुक्रवारी केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे यांच्याकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...