आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळजाेडणीचे काम:पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण; पण डांबरीकरणाला ब्रेक

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड वर्षापासून निधी मंजूर असतानाही केवळ पाणीपुरवठा विभागाच्या कामाअभावी रस्त्यांच्या कामाला अडथळा निर्माण झाला हाेता. प्रभाग क्रमांक १२च्या नगरसेवकांनी तक्रार करताच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने काम पूर्ण झाल्याचे पत्र बांधकाम विभागाला दिले आहे.

नगरसेवक नितीन बरडे यांनी आयुक्तांना पत्र लिहून प्रभाग १२मध्ये केवळ अमृत अंतर्गत नळजाेडणीचे काम पूर्ण हाेत नसल्याने डांबरीकरणाचे काम हाेऊ शकले नसल्याचे कळवले हाेते. यामुळे नागरिकांचा राेष वाढत आहे.

पावसाळा संपण्यापूर्वी अमृत याेजनेेची सर्व कामे पूर्ण करावी. अन्यथा नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागेल, असा इशारा दिला हाेता. त्यानंतर आयुक्त विद्या गायकवाड यांनी आदेश दिले हाेते. पाणीपुरवठा विभागाने प्रभाग क्रमांक १२मधील शाखा अभियंता यांना चार रस्त्यांवरील पाणीपुरवठ्याशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाल्याचे कळवले आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने आता कामे पूर्ण केल्यानंतर टेस्टिंग करावी त्यात काही अडचणी असल्यास त्या साेडवाव्या. म्हणजे सप्टेंबर महिन्यात पावसाळा कमी हाेताच रस्ते डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...