आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:आम्ही गद्दार नव्हे खुद्दार ; पाटील

सामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हाला गद्दार म्हटले जाते परंतु, आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत. भाजप, शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली होती; परंतु आमचे २५ वर्षांपासूनचे विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तेत भागीदार झालो. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतानाही आम्हाला निधी मिळत नव्हता, असे प्रतिपादन आमदार किशाेर पाटील यांनी केले.

पाचाेरा तालुक्यातील नांद्रा येथे आगामी जिल्हा परिषद, मार्केट कमिटी, नगरपालिका, शेतकी संघ यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुरांगी, बांबरूड गटाच्या शिवसेना, युवासेनेच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, युवासेनेचे प्रमुख योगेश पाटील, माजी जि.प.सदस्य संजय पाटील, अनिल पाटील, गणेश पाटील, किशोर बारवकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...